

दर्पण न्यूज पलूस प्रतिनिधी: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक 14 ते सोमवार दिनांक 18 मे यादरम्यान पलूस येथे होणाऱ्या यशवंत फेस्टिवलच्या मंडप उभारणीचे उद्घाटन दहावी परिक्षेत शंभर टक्के गुण मिळवून यशस्वी झालेल्या शरयु विश्रांती बाजीराव पाटील हिच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
प्रदीप आप्पा कदम यांनी शरयु पाटील हिचा शाल, स्मृती चिन्ह व बुके देऊन सत्कार केला. प्रदीपआप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम यांच्या वतीने करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील, उपनगराध्यक्ष रोहीत दळवी, नगरसेवक अनिल कांबळे, संजय गोंदील, युवा उद्योजक चंद्रदीप बुचडे, भाजपचे सागर सुतार, प्रकाश पुदाले, कृष्णा मिठारी, निशांत आवळेकर, अमोल पाटील, पलूस कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तौफिक मुल्ला, सौरभ तवटे, भाजपा नेते कृष्णराव पाटील, शरद देसाई, प्रतापनाना पाटील, पत्रकार यशवंत कदम, शशिकांत रेपाळ, शशिकांत राजवंत, संदीप नाझरे, जमिर सनदी, पंकज गाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी बोलताना प्रदीपआप्पा कदम म्हणाले, पलूस येथील गुंडा दाजी लॉन कराड तासगाव रोड पलूस येथे सायंकाळी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे फेस्टिवल नागरिकांसाठी खुले असणार आहे. इथे खरेदीची महापर्वणी आहे. विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, होम अप्लायसेस, इमिटेशन ज्वेलरी, आकर्षक ड्रेस मटेरियल, मोबाईल आणि सोलर उपक्रमांच्या खरेदीचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे. आणि यासोबत अस्सल महाराष्ट्र खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी नागरिकांना पर्वणी मिळणार आहे. या फेस्टिवलचं सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे सर्वांसाठी 18 हुन अधिक गेम, राइड्स आणि मनोरंजन उपलब्ध करण्यात आले आहे. आकाश पाळणा, टोराटोरा, ड्रॅगन ट्रेन, नावडीसह फनफेअरचा मनसोक्त आनंद घेऊ शकाल. नागरिकांच्या मनोरंजनाकरिता एकापेक्षा एक असे सरस सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिनांक 14 रोजी सर्किट नाना हा लाईव्ह शो होणार आहे. दिनांक 15 रोजी विनया एंटरटेनमेंट प्रस्तुत प्रवीण विनया विजय राणे निर्मित सर्व 45 भूमिका महिला कलाकारांनी साकारलेले ऐतिहासिक दोन अंकी नाटक शिवप्रताप सादर होणार आहे. दिनांक 16 रोजी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित मराठमोळा लोक कलाविष्कार गर्जा महाराष्ट्र माझा.. गुणगान मराठी मातीचे वैभवशाली संस्कृतीचं हा अत्यंत देखणा कार्यक्रम आहे. दिनांक 17 रोजी गायिका श्वेता दांडेकर व सहगायक शुभम सातपुते यांचा लाईव्ह गायन व नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दिनांक 18 रोजी प्रेक्षणीय अशा भव्य रेकॉर्डिंग स्पर्धा होणार आहेत. यशवंत फेस्टिवलच्या माध्यमातून पलुस्कारांसाठी मनोरंजनाचा खजिनाच खुला होणार आहे. यावेळी सावंतपूरचे नेते सुनील काका सावंत, हिंदुराव सावंत, प्रकाश दादा मांगलेकर, वसंत दूध संघाचे चेअरमन अशोक दादा पाटील, आरपीआयचे पलूस तालुका अध्यक्ष बोधिसत्वनाना माने, तुकाराम सावंत, सामाजिक कार्यकर्ते संजय मदने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस तानाजीराजे जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पलूस तालुका अध्यक्ष विशाल पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती दीपक मोहिते, विश्वकर्मा योजनेचे समन्वयक महेश सुतार, राष्ट्रवादी काँग्रेस रामानंदनगरचे अमीर भैया पठाण, उल्हास पाटील, श्रीयोग पाटील, शुभम निकम, हरीश वडार, संजय शिंदे, अभिजीत कौलगे, तुषार सुर्यवंशी, अभिजीत पाटील, अनिल पाटील, पंकज सावंत, अरुण जाधव, मधुकर सावंत, सौमेद परीट, विजय परबत ओंकार परबत, रोहित परबत, अर्जुन भांडगे, आशिष सूर्यवंशी, प्रसाद कदम, आदित्य धनवडे, अंकुश गस्ते, राहुल पाटील, महेश हजारे, शैलेश घाडगे, रणजीत शिंदे उपस्थित होते.