

दर्पण न्यूज पलूस भिलवडी :– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सांगली पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील पवित्र स्मृतीस्थळावर भीमभक्तांचा मोठा मेळा भरला होता. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि त्यांच्या अस्थी जतन केलेल्या या भूमीचे दर्शन घेण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक राज्यातूनही हजारो अनुयायी दाखल झाले होते.
अंकलखोप येथील हे ठिकाण समस्त अनुयायांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. मात्र, गेल्या काही काळापासून या अस्थी स्थळाची दुरावस्था झाली होती. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष *मा. प्रदीप (आप्पा) कदम* यांनी कोणत्याही मागणीची वाट न पाहता, स्वखर्चातून या स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण केले. बदललेले देखणे आणि सन्मानजनक रूप पाहून उपस्थित अनुयायांनी समाधान व्यक्त केले. “प्रदीप आप्पांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपला आहे,” अशा भावना याप्रसंगी जनसामान्यांनी व्यक्त केल्या.
मंगळवारी पहाटे २ वाजल्यापासूनच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भीमभक्त विचारांची ज्योत नेण्यासाठी येथे जमू लागले होते. सकाळी ११ वाजता सर्व भीम भक्त, सर्व शासकीय अधिकारी, स्वतः प्रदीप (आप्पा) कदम, तसेच, जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी राजेंद्र कुंभार सर, दौलत पाटील, महेश हजारे, प्रदीप लांडगे, अरविंद लांडगे, अमित कांबळे, कुलदीप वारे, सचिन कुराडे, अंकुश गस्ते, संजय लांडगे आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*’भीमा तुझ्या जन्मामुळे’ महानाट्याने मंत्रमुग्ध झाले अनुयायी*
प्रदीप (आप्पा) कदम यांच्या पुढाकारानेच सायंकाळी ७ वाजता बाबासाहेबांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित *”भीमा तुझ्या जन्मामुळे – एका क्रांतीसूर्याची धगधगती अंगार गाथा”* हे महानाट्य सादर करण्यात आले. या महानाट्यातून बाबासाहेबांचा जीवनपट जिवंत झाल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. प्रबोधनपर अशा या कार्यक्रमाने जयंती उत्सवात एक वेगळीच उंची गाठली.
या यशस्वी आयोजनासाठी सुशांत लांडगे, दिवेश लांडगे, तुषार सूर्यवंशी, अमीर पठाण, राहुल पाटील, सागर कदम, दीपक कदम, भास्कर संकपाळ, हरीश वडार, अनिल पाटील, उल्हास पाटील, अभिजीत कौलगे, अभिजीत कौलगे, अभिजीत सावंत, विजय परबत, अर्जुन भांडगे, अभिजीत कदम, सौमेद परीट, ओमकार परबत, संजय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण अंकलखोप परिसर यावेळी ‘जय भीम’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.