
दर्पण न्यूज कोल्हापूर :-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून आज हातकणंगले येथील मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहास भेट देऊन तेथील व्यवस्थेची सविस्तर खासदार धनंजय महाडिक यांनी पाहणी केली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बाबासाहेबांच्या जीवनातील प्रेरणादायी पैलू आणि त्यांच्या संघर्षाच्या गाथा नव्या-जुन्या संदर्भांसह त्यांच्यासमोर मांडल्या. बाबासाहेबांनी ज्या शिक्षणाला प्रगतीचे मुख्य साधन मानले, त्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी या विद्यार्थ्यांशी केलेली ही चर्चा अत्यंत सकारात्मक ठरली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी DPDC (जिल्हा नियोजन समिती) माध्यमातून सुचवलेल्या नवीन अत्याधुनिक ‘संगणक कक्षाचे’ (Computer Lab) उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. डिजिटल युगात आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे पडू नयेत, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. केवळ औपचारिक भेट न थांबवता, आज या मुला-मुलींसोबत बसून भोजनाचा आनंद घेतला. त्यांच्या समस्या आणि सूचना प्रत्यक्ष जाणून घेतल्या असून, त्या सोडवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांना दिला. समाजातील शेवटच्या घटकातील मुलांच्या हाती दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान देणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, असे मत खासदार महाडिक यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी कोल्हापूर समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त मा. सचिन साळे साहेब, जिल्हाध्यक्ष भाजपा मा. श्री. राजवर्धन नाईक निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस भाजपा मा. श्री. सतीश पंडित, जिल्हा सरचिटणीस भाजपा मा. श्री. शहाजी भोसले, मंडलाध्यक्ष हातकणंगले मा. श्री. शितल हावले, मंडल अध्यक्ष वडगाव मा. श्री. अमर पाटील, जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. प्रसाद खोबरे,माजी
मा. श्री. औरंग शेख, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी मा. श्री. पंकज बुद्धे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.