दर्पण न्यूज पलूस भिलवडी -: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे आज 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष मा. गिरीश चितळे यांनी प्रतिमापूजन केले. यावेळी उपाध्यक्ष डी आर कदम सर जी जी आप्पा जयंत केळकर सर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक सुभाष कवडे सर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल सौ मयुरी नलवडे सौ विद्या निकम आणि माधव काटिकर यांनी केले. यावेळी वाचनालयाचे संचालक विश्वस्त वाचन सभासद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.