दर्पण न्यूज मिरज/सांगली :- सांगली येथील सियाराम सेवाभावी संस्था च्या वतीने सांगलीत व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र मध्ये विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सतत अग्रेसर असलेली संस्था दरवर्षीप्रमाणे यंदाही बापट मळा महावीर उद्यान मध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटक मारुती नवलाई आणि संस्थेचे संस्थापक बसवराज पाटील यांच्या माध्यमातून पहाटेपासूनच संगीत भक्तीगीत भावगीत भजन संध्या विविध उपक्रम प्रसाद वाटप असे उपक्रम दिवसभर सुरू होते यामध्ये हरिप्रिया महिला भजनी मंडळ च्या सौ संगीता मध्याळी, सौ स्मिता कुलकर्णी, सौ ज्योती राऊतमारे, सुनीता बर्वे, तबलावादक सागर काळेबेरे, उज्वला कळंत्रे, सौ सुरेखा हुनुगरे ,सुनंदा गोंदकर, श्रीमती अनिता कुलकर्णी, श्रीमती प्रज्ञा लिमये, सौ पल्लवी मेहेंदळे, सौ मनीषा पोतदार ,राधिका भडेकर आदी भजनी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी या हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपले भजन व इतर गीत साजरी केले. यावेळी सायंकाळी आलापिणी भजनी मंडळ यांचेही भजन गीत भक्तीगीत साजरी करण्यात आले ,शुभांगी जामदार यांच्या सर्व सहकारी वतीने
प्रारंभी सर्व भक्तांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले. सदर जयंती मध्ये नारायण चोपडे ,चवगोड पाटील, दत्तात्रय काटकर, तसेच उद्योजक गजानन आडमणी आदींनी परिश्रम घेतले.
दरम्यान ,सियाराम सेवाभावी संस्था सांगली च्या वतीने बापट मळा येथील महावीर उद्यान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंती साजरी केली .बसवराज पाटील सामाजिक कार्यकर्ते मारुती नवलाई ,हरिप्रिया महिला भजनी मंडळ सांगलीच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य लाभले.