


दर्पण न्यूज ईश्वरपूर कामेरी ; महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली अंतर्गत सावित्री लोकसंचालित साधन केंद्र अंकलखोप मार्फत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत गणेश मंदिर कामेरी येथे सुधारक सन्मान पुरस्कार 2025-2026 कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी भिलवडी येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे यांचाही सुधारक सन्मान पुरस्कार 2025-2026 चा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रेखा रुपनर महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती इस्लामपूर, . जयराज पाटील जिल्हा परिषद सदस्य सांगली, छाया कांबळे सावित्री लोकसंचालित साधन केंद्र अंकलखोप वनिता कांबळे , रुपाली कांबळे सौ अनुजा कुलकर्णी कार्यकारणी सावित्री लोकसंचालित साधन केंद्र अंकलखोप श्रीमती शामल माळी श्रीमती जयश्री हिरवे पर्यावेक्षिका पंचायत समिती इस्लामपूर, सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली या प्रसंगी श्रीमती रेखा रूपनर मॅडम यांनी महिला व पुरुष यांच्या भूमिका जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन केले.
श्री जयराज पाटील यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. अरुणा पाटील मॅडम यांनी स्त्री पुरुष समानते विषयी महिलांना मार्गदर्शन केले. श्री प्रशांत पाटील शिवव्याख्याते यांनी उपस्थितांना समाजातील पुरुषांचे वर्तन व्यसनाधीनता स्त्रियांवर होणारे अत्याचार अन्याय कशाप्रकारे दूर करता येतील याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी 25 पुरुषांना सुधारक सन्मान पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी वाळवा पलूस कार्यक्षेत्रातून पुरुष व महिला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन सहयोगिनी राधिका माळी, रूपाली कोळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा हाबळे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार दीपाली सरकाळे यांनी केले.
यावेळी भिलवडी येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे यांचाही सुधारक सन्मान पुरस्कार 2025-2026 चा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राहुल कांबळे यांचे अनेक मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.