*भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त रक्तदान व मोफत रक्ततपासणी आयोजनशिबिराचे आयोजन*
दर्पण न्यूज पलूस वसगडे:- महावीर जयंती निमित्त सकल दिगंबर जैन समाज, जैन युवा मंच वसगडे व जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडी तसेच शाश्वत ब्लड बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र, भिलवडी व महालॅब यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर व मोफत रक्ततपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले .
आचार्य 108 विदेहसागरजी महाराज व 105 वात्सल्यसागर महाराज यांच्या आशिर्वाद घेऊन प्रद्युम्न पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच श्री. गिरीश चितळे यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धाचे उदघाट्न करण्यात आले . दिपप्रज्वलन श्री.मकरंद चितळे,अमोल पाटील, अनिल पाटील, धन्यकुमार पाटील, श्रेणिक पाटील, रावसाहेब पाटील, सुदर्शन चौगुले,जायन्ट्सचे अध्यक्ष बाहुबली चौगुले,महावीर चौगुले, डॉ.कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये एकूण *57* रक्तदात्यांनी रक्तदान केले व *98* पुरुष व स्त्रियांची रक्ततपासणी झाली . यामध्ये 60% महिलांची रक्ततपासणी झाली.यासाठी पलूस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल सूर्यवंशी,महालॅबचे व्यवस्थापक सयाजीराव झांबरे व त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले. शिबिरामध्ये युवा वर्ग व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या शिबिरासाठी दिपक पाटील, सम्मेद पाटील, अनिकेत पाटील, रोहन पाटील सुबोध वाळवेकर, दत्ता उथले, डॉ.कुलकर्णी, सचिन मगदूम, राजू कुंभार, सनी ऐतवडे, धीरज सूर्यवंशी, सुनिल परीट हे मान्यवर उपस्थित होते अशी जायन्ट्सचे अध्यक्ष श्री.बाहुबली चौगुले यांनी माहिती दिली .