दर्पण न्यूज हातकणंगले; तारदाळ गावांमधील संयुक्त संगमनगर मध्ये श्रीराम नवमी उत्सव श्रीराम चौक येथे साजरा करण्यात आला. प्रथम कान्होपात्रा भजनी मंडळ यांचे वतीने भक्ती भाव गीते सादर करण्यात आली त्यानंतर कराओके सिस्टीम द्वारे भक्ती भावगीते श्री मुकुंद चौगुले व श्री प्रमोद सिंहासने श्री सुनील मांगलेकर ,श्री राजू नदाफ या सर्वांची प्रभू रामचंद्रांच्या वरील गाणी सादर करण्यात आली .त्यानंतर सत्कार समारंभ माननीय कार्यसम्राट आमदार श्री राहुल आवाडे तसेच जिल्हा परिषद सदस्य सानिका आवाडे , जिल्हा परिषद ग्राम पंचायत सदस्य सौ. प्रियांका खोबरे यांच्या सत्कार करण्यात आला तसेच पुढे ह. भ. प .प्रथमेश इंदुलकर यांचे श्री प्रभू रामचंद्र यांचे व छत्रपती शिवाजी महाराज ,संभाजी महाराज व सद्यपरिस्थितीतील मुलांच्यावर सुंदर असे व्याख्यान सादर केले संपूर्ण कार्यक्रम पार पडण्याकरिता भागातील सुनील मांगलेकर , दत्तात्रय सोनवणे, संजय महाडिक ,अमर कोळी रोहित पोळ ,राजू गट्टे ,सुमित साटम , संजय पाटील, आनंद ग्वाडी व इतर सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले अशा तऱ्हेने कार्यक्रम सुंदर यशस्वी पणे सादर करण्यात आला. तारदाळ ग्रामपंचायत सदस्य आणि संगमनगर भागातील सर्वजण श्रीराम नवमी कार्यक्रमास उपस्थित होते.