दर्पण न्यूज मिरज/सांगली : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवार, दिनांक 27 मार्च 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 27 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर येथून सांगलीकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता पोलीस मुख्यालय विश्रामबाग सांगली येथे आगमन व जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 च्या निधीतून मंजूर सांगली जिल्हा पोलीस दलाकडील विविध विकास कामांच्या भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.45 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आगमन व ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह खरेदीदार-विक्रेता मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.15 वाजता दि डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन हॉल, माधवनगर रोड, अभयनगर, सांगली येथे आगमन व सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. सांगली यांच्यावतीने आयोजित पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे आगमन व जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 च्या निधीतून मंजूर शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मिरज येथील अत्याधुनिक बर्न आयसीयु, सोनोग्राफी, अत्याधुनिक शवविच्छेदन विभाग या कामाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 4.15 वाजता संजय भोकरे ग्रुप इन्स्टिट्युट, मेकॅनिकल हॉल, सांगली-मिरज रोड, मिरज येथे आगमन व दैनिक जनप्रवास रणरागिनी पुरस्कार वितरण सोहळा-2026 च्या कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.15 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, सांगली मिरज रोड, सांगली येथे आगमन व जिल्हा क्रीडा संकुल, सांगली येथील नुतनीकरण केलेल्या बॅडमिंटन हॉलच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 6.15 वाजता श्री. हणमंत मोहिते, संपादक, दैनिक सोनहिरा यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव, स्थळ – फ्लॅट नंबर 101 बागेश्री अपार्टमेंट किसान चौक महावीर उद्यान जवळ सांगली. सायंकाळी 6.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. रात्री 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून मिरज रेल्वेस्थानकाकडे प्रयाण. रात्री 9.45 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. रात्री 9.55 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने पुणेकडे प्रयाग.