दर्पण न्यूज मिरज/सांगली: ऑईल मार्केटिंग कंपनीच्या नियमांनुसार पंपावर पेट्रोल व डिझेलची फक्त रिटेल विक्री (Retail Sale) करण्यास परवानगी आहे. कोणत्याही परिस्थितीत बल्क विक्री (Bulk Sale) किंवा ब्राउझर/लूज सेल करणे नियमबाह्य आहे. त्यामुळे या नियमांचे काटेकोर पालन केले जावे. संबंधित कंपन्यांच्या सेल्स ऑफिसर यांनी याबाबतच्या सूचना सर्व पेट्रोल पंप व्यवस्थापकांना द्याव्यात, अशा सूचना प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, पेट्रोल पंप व्यवस्थापकांनी प्लास्टिक बाटल्या, कॅन किंवा PESO मान्यता नसलेल्या कंटेनरमध्ये पेट्रोल किंवा डिझेल देऊ नये. इंधन फक्त वाहनाच्या टाकीतच भरावे. MS (Motor Spirit) किवा IISD (Diesel) ची बल्क विक्री पूर्णपणे बंद आहे. तरी प्लास्टिक बाटल्या, कॅन यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल देण्याचा कोणीही आग्रह करु नये. संबंधित कंपन्यांच्या सेल्स ऑफिसर यांनी याबाबतच्या सूचना सर्व पेट्रोल पंप व्यवस्थापकांना देण्यात याव्यात, असे जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
00000