दर्पण न्यूज पलूस:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालय, दुधोंडी येथील सन १९८८-८९ या वर्षीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आणि निरोप समारंभ मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. सुमारे 37 वर्षांनी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाला भावनिक रंग चढवला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या शाळेला भेट देत आठवणींना उजाळा दिला. यावेळी संस्थेचे सचिव मिलिंद जाधव यांनी सर्वांचे मनापासून स्वागत केले. त्यानंतर पलूस येथील हॉटेल लंगर येथे मुख्य कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर आपल्या दिवंगत गुरूवर्यांना आणि मित्रांना श्रद्धांजलि वाहण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत दुधोंडी ग्रामविकास सोसायटीचे चेअरमन शहाजी रामचंद्र जाधव यांनी केले. प्रास्ताविक ओएनजीसी पेट्रो कंपनी चे D.G.M. श्री. अनिल पवार यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर उपस्थित सर्व माजी शिक्षक व शिक्षकेतर मान्यवरांना स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यानंतर सुनिता चव्हाण, कमल शिंदे, प्रेमला गावडे, शांता जाधव, लता गोरे, प्रशांत आरबुने, उल्हास साळुंखे, राजेंद्र जाधव, प्रकाश जाधव आदि माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा दिला. अनेकांनी आपल्या यशामागील शाळा व शिक्षकांचे योगदान अधोरेखित केले.
त्यानंतर यावेळी माजी शिक्षक अशोक खोत, गणपतराव सुर्वे, दत्तात्रय कदम आणि एस. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देत मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार मानसिंग को-ऑपरेटिव्ह बँकेचे जनरल मॅनेजर हनमंत महाडिक यांनी मानले.