शिरसगाव सोनसळ : जागतिक संस्कृत दिनानिमित्त डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम विद्यालय, शिरसगाव सोनसळ येथे विविध उपक्रमांनी संस्कृत दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक अदाटे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
कार्यक्रमाची सुरुवात व्याकरण महर्षी पाणिनी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी संस्कृत भाषेचे महत्त्व आणि पाणिनींच्या व्याकरणातील योगदान यावर शिकलगार मॅडम यांनी प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी धर्माधिकारी हिने केले. संस्कृत दिनानिमित्त ज्ञानेश्वरी लावंड, दूर्वा कदम, श्रावणी देशमुख, अक्षरा भोसले, सक्षम कदम, अनिकेत मांडके आणि अनुराधा गोसावी या विद्यार्थ्यांनी भाषणं केली. विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेतील श्लोक, सुभाषिते आणि भाषणाद्वारे संस्कृतचे महत्त्व पटवून दिले.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सातवी वर्गाच्या वर्गशिक्षिका शिकलगार मॅडम यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी दूर्वा कदम हिने आभार प्रदर्शन केले.संस्कृत ही देवभाषा असून ती जतन करणे ही आपली जबाबदारी आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
