दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार):—सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा नगरपालिका हद्दीतील विटा नविन भाजी मंडई रोड,येथील गुळवणी यांच्या मोकळ्या जागेत, रिलायन्स कंपनीचा टावर आहे, गेले अनेक वर्षे हा टावर बंद अवस्थेत आहे, या टावरच्या सर्व वायरी जमिनीमधून असल्याने काही वायरी टावरच्या समोरील डीपीला गुंडाळलेले आहेत तर काही वायरी मोकळे आहेत, तरी या वायरीमध्ये एक मोकाट कुत्रे अडकले होते, त्याच्या गळ्याला पूर्ण या वायरीचा फास लागून राहिला होता, मरणेच्या वेदना हे कुत्रे घेत होते, परंतु तिथे एक व्यक्ती काही कामानिमित्त गेल्यानंतर त्याच्या निदर्शनास वायरीच्या गुत्त्यामध्ये एक कुत्र अडकलेल्या निदर्शनात आले, त्याने तातडीने विटा नगरपालिका मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांना माहिती दिली त्यानंतर विटा नगरपालिका मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी अग्निशामक दलचे संबंधित अधिकारी श्रीकांत यांना या संदर्भात माहिती दिली व तातडीने त्या ठिकाणी जाण्याचे आदेश दिले त्यानंतर अग्निशामक दल जवानांनी, अग्निशामक दल जवान यांनी घटनास्थळी दाखल झाले, सदर बंद प्लाट झाडाझुडपे गवत काँग्रेस मधून स्वतःचा जीव धोक्यात घालून हे जवान त्या वायरीच्या गुत्त्यात अडकलेल्या कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी धावून गेले, कदाचित आपल्या जीवाची परवा न करता या जवानांनी त्या कुत्र्याचा जीव वाचवला, वायरीच्या गुत्त्यातून सोडवले वायरी कापल्या त्या कुत्र्याला त्यातून बाहेर काढले, तसेच त्याला झालेल्या जखमेवर पावडर लावली आणि कुत्रे सोडून दिले, त्यामुळे विटा नगरपालिकेच्या अग्निशामक दल जवानांनी एका कुत्र्याचा जीवा चावल्याने नागरिकांतून त्यांचे कौतुक व अभिनंदन झाले, यामध्ये रोहित सातपुते, विनोद रामचंद्र यादव, स्वच्छता दूत शिराज शिकलगार, विजय लोखंडे, सुखदेव रामचंद्र यादव, जय सकट, यांनी ही दमदार कामगिरी केली.
