दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :- पोलीस ठाणे कळंब चे पोलीस निरीक्षक शकील शेख व त्यांचे पथकाने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली कळंब शहरामध्ये अवैध जुगार अड्यावर मोठी कार्यवाई केली. गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या बातमीवरुन कळंब शहरातील तहसिलदार बाबा दर्गाजवळ एका बंधीस्त पत्र्याचे शेडमध्ये प्रशांत जाधव यांचे मालकीच्या पत्र्याचे शेडमध्ये पोलीसांनी पंचासह सायंकाळी 19.00 वाजण्याचे सुमारास अचानकपणे छापा मारला असुन छाप्यामध्ये 06 आरोपी व रोख रक्कम 22070/- रु तसेच तिर्रट नावाच्या जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदर कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम, व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन पांडकर साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक शेख, सहा. पोलीस निरीक्षक बजबळकर, पोउपनि पठाण, पोहेकॉ / 952 राहिंज, पोना / 1465 पोळ, पोकॉ/832 खाडे, पोकॉ/1814 अशमोड, पोकॉ/ 1832 माळी यांचे पथकाने केली.
