
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार):–सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ( विटा नेवरी रोडवरील पाटील वस्ती, भवानी माळ,) या परिसरात काल रात्री पहाटे ३/४० मिनिटांनी काही तीन ते चार मोटारसायकल चोरट्यांनी दुचाकी मोटरसायकल चोरी करण्याचा प्रयत्न केला,.
या चोरी प्रकारणातील संशयित मोटारसायकल चोरट्यांनी भवानी माळ पाटील वस्ती या परिसरात घरात समोर,तसेच प्लाटमध्ये रात्रीच्या वेळी लावलेल्या मोटारसायकली चोरी केल्याचेही स्पष्ट झाले आहे,त्या परिसरात तीन ते चार मोटारसायकल मधील एक दुचाकी मोटरसायकल या अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने तिथून उचलूनच नेली, या दुचाकी मोटरसायकल चोरीचा सर्व प्रकार तिथे असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे चोरटे मोटरसायकल चोरुन नेताना कैद झाले आहेत,तर अंदाजे हे ३ ते ४ चोरटे तरी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत,या घटनेमुळे पाटील वस्ती भवानी माळ,सह नेवरी रोड परिसरात नागरिकांतून भीतिदायक निर्माण झाली आहे, चोरट्यांनी या परिसरातच धुमाकूळ घातला आहे, तिथे असणाऱ्या एका शिक्षकाची दुचाकी मोटारसायकल चोरीला गेली आहेत या घटनेनंतर नागरिकांनी विटा पोलिसाना ही माहिती दिली, , त्यानंतर विटा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली, व या चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी परिसर पिंजून काढला, त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजचे मध्ये या तर त्यांचं वर्णन व चोरटे किती होते ही पाहणी केली व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले, होते या सीसीटीव्ही मध्ये तीन ते चार मोटरसायकल चोरटे मोटारी सायकल चोरताना निदर्शनास आले आहेत, या चोर त्यांनी त्या परिसरातल्या अन्य काही गाड्यांचे लाॅक तोडण्याचा प्रयत्न केला आहे,तर एक गाडी चोरट्यांनी उचलूनच नेली, या घडलेल्या प्रकरणानंतर विटा पोलिसांनी सर्वत्र या चोरट्यांचा त्यांचा शोध घेतला,पण कुठं आढळून आली नाही, या चोरट्याचा शोध विटा पोलीस घेत आहेत.
