सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे मराठी भाषा गौरव दिवस विविध उपक्रमांनी साजरा

दर्पण न्यूज पलूस/भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे 27 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यानिमित्त सुनिता पाटणकर आणि रश्मी फडके बेळगाव यांचा बालकवींच्या कवितांची आनंद यात्रा हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे होते प्रारंभिक कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पाटणकर आणि फडके यांनी बालकवींच्या जीवन चरित्राची आणि कवितांची अभ्यासपूर्ण माहिती सादर करून काही कवितांचे प्रभावीकरण सादरीकरण केले आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक कार्यवाहक सुभाष कवडे यांनी केले पाहुण्यांचा परिचय उपाध्यक्ष डी आर कदम यांनी करून दिला यावेळी विद्या निकम यांनी मराठी अभिमान गीत सादर केले तर प्राजक्ता कुलकर्णी यांनी ग्रंथालय गौरव गीत सादर केले वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांनी मराठी मायबोली समृद्ध करण्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगून बोलीभाषा अधिक समृद्ध झाल्या पाहिजेत असे अगत्याने सांगितले सूत्रसंचालन ग्रंथपाल सौ मयुरी नलवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्या निकम यांनी मांडले यावेळी श्रीमती सुनिता चितळे वहिनी सौभाग्यवती भक्ती चितळे मकरंद चितळे वाचनालयाचे सर्व पदाधिकारी वाचन कट्टा सभासद वाचक बंधू भगिनी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम सार्वजनिक वाचनालय भिलवडी व जायंट्स ग्रुप सहेली यांचे संयुक्त पणे संपन्न करण्यात आला.



