महाराष्ट्रराजकीयसामाजिक

पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या संकल्पनेतून कसबा बावडा येथील सेवा रुग्णालय येथे 9 ते 14 मार्च रोजी मोफत शस्त्रक्रिया अभियान

 

दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील

सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभाग व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा रुग्णालय कसबा बावडा कोल्हापूर येथे ९ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत. या शस्त्रक्रिया मुंबई, पुणे व कोल्हापूर येथील नामांकित विशेषतज्ञ यांच्यामार्फत करण्यात येणार आहेत.
कान, नाक व घसा शस्त्रक्रिया (सेप्टोप्लास्टी, टॉन्सीलेक्टटॉमी व इतर), स्त्रीरोग शस्त्रक्रिया (हिस्टेक्टॉमी, लॅप्रोस्कॉपी, ऑव्हॅरॅन्ससीस्ट, ट्युबलायगेशन), इतर सामान्य शस्त्रक्रिया (हार्निया रिपेअर, अपेन्डीक्स व इतर)
आज पासून सेवा रुग्णालय, कसबा बावडा येथे नाव नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून गरजू रुग्णांनी या मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक वर्ग-१ डॉ. निलिमा पाटील यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!