महाराष्ट्रराजकीय
युथ आयकॉन कृष्णराज महाडीक शनिवारी कोल्हापुरात

दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष, युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक शनिवारी कोल्हापूर मध्ये येणार आहेत. शनिवारी सायंकाळी चार वाजता, त्यांचे छत्रपती ताराराणी चौकात भव्य स्वागत करण्याचे नियोजन केले आहे. भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कृष्णराज महाडिक यांच्या मित्रमंडळींनी, या जल्लोशी स्वागत सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता कोल्हापुरातील नागाला पार्क इथल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात एक विशेष बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये शनिवारच्या स्वागत सोहळ्याचे काटेकोर नियोजन केले जाईल. या बैठकीला भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



