पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा गुरुवारी सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज मिरज/ सांगली : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गुरूवार, दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजीच्या सांगली जिल्हा दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.50 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून साईनंदन पार्क, मिरज कडे प्रयाण. सकाळी 8 वाजता गणेश माळी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ – साईनंदन पार्क, म्हाडा कॉलनी शेजारी, मिरज. सकाळी 8.25 वाजता साईनंदन पार्क येथून पत्रकार नगर सांगली कडे प्रयाण. सकाळी 8.40 वाजता पत्रकार नगर, एस.टी. स्टँड मागे, सांगली येथे आगमन व दैनिक ललकार कार्यालयास सदिच्छा भेट. सकाळी 9.15 वाजता शीतल लोंढे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ – लोंढे मळा, डॉ. पी.आर. पाटील मार्ग, गणेशनगर, सांगली. सकाळी 9.40 वाजता गणेशनगर, सांगली येथून विजयनगर, सांगलीकडे प्रयाण. सकाळी 9.55 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आगमन व पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीस ऑनलाईन उपस्थिती. सकाळी 10.45 वाजता शासकीय बैठकीसाठी राखीव, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली. दुपारी 12.20 वाजता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 च्या राज्यस्तरीय बैठकीस व्हीडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे उपस्थिती (सांगली जिल्हा), स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपारी 12.40 वाजता राखीव, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपारी 1.20 वाजता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 च्या राज्यस्तरीय बैठकीस व्हीडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे उपस्थिती (पुणे जिल्हा), स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपारी 2 ते 5.30 वाजेपर्यंत शासकीय बैठकांकरिता राखीव, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, सायंकाळी 5.45 वाजता सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर व हनुमाननगर येथील अग्निशामक केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – हनुमानगर, सांगली. सायंकाळी 7 वाजता पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र चि. विरेंद्रसिंह यांच्या विवाह समारंभास उपस्थिती, स्थळ – कल्पद्रुम (राजमती) क्रीडांगण, नेमिनाथनगर, सांगली. सोयीनुसार कोल्हापूर निवासस्थानाकडे प्रयाण.



