येडशी गटातील जनतेच्या विश्वासाला सलाम ; भाजप उमेदवार संजय महादेव लोखंडे मतदारांना मनापासून आभार

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुने)
येडशी जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संजय लोखंडे यांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान मिळालेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल गटातील सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले आहेत.
“ येडशी गटातील जनतेने मला दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हा माझ्यासाठी सन्मानास्पद असून ही केवळ माझी वैयक्तिक लढाई नसून सर्वसामान्यांच्या विकासाची चळवळ आहे. प्रत्येक मतदाराने दाखवलेला उत्साह मला पुढील काळात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.”
निवडणूक प्रचारादरम्यान प्रत्येक गाव, वाडी-वस्तीतील नागरिकांनी दिलेला प्रतिसाद अविस्मरणीय असल्याचे सांगत त्यांनी ज्येष्ठ, युवक, महिला, शेतकरी व कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानले. “विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कारभार हाच माझा ध्यास असून येडशी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.
“ येडशी गटाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येत विकासाची ही वाटचाल अधिक मजबूत करूया.



