महाराष्ट्रसामाजिक

सांगली ; माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश लागू

    दर्पण न्यूज मिरज / सांगली : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. 12 वी) दि. 10 फेब्रुवारी 2026 ते दि. 11 मार्च 2026 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी) दि. 20 फेब्रुवारी 2026 ते दि. 18 मार्च 2026 या कालावधीत घेण्यात येणार आहे.  सांगली जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा एकूण 52 परीक्षा केंद्रावर तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एकूण 105 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू केले असून पुढील कृत्यांना मनाई केली आहे.

           परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधित अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिंना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परीक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परीक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!