पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हा नियोजन समितीची सभा

दर्पण न्यूज कोल्हापूर, (अनिल पाटील)-:
जिल्हा नियोजन समितीची सभा मंगळवार, दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बैठकीस नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत 23 जून 2025 रोजी आयोजित जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या इतिवृत्तास व इतिवृत्तावरील कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत दि. 7 फेब्रुवारी 2026 अखेरील खर्चाचा आढावा, जिल्हा वार्षिक योजना 2025-26 मधील पुनर्विनियोजनास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 प्रारुप आराखड्यास मान्यता देणे व आयत्या वेळचे विषय होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अमोल येडगे यांनी दिली.



