




दर्पण न्यूज भिलवडी/पलूस :
भिलवडी जिल्हा परिषद गटातील उमेदवार, भिलवडी , वसगडे पंचायत समिती गणातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा , असे आवाहन माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले. भिलवडी येथे भिलवडी जिल्हा परिषद गटाच्या सांगता सभेत ते बोलत होते .
भिलवडी जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार महेश रंगराव पाटील (सर), माळवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुनिता शिवाजी गायकवाड ,वसगडे पंचायत समिती गणाच्या उमेदवार मंजुषा धोंडीराम पाटील यांना विजयी करा, असे आवाहन भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांचे जोरदार भाषण झाले . यावेळी भाजपचे नेते, पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. या सांगता सभेला भिलवडी, वसगडे, माळवाडी आणि इतर गावांतील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.