महाराष्ट्रराजकीय

सदस्य, थेट सरपंचाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांकरिता मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

      दर्पण न्यूज मिरज/ सांगली : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंचाच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकांकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहीर केला आहे.

            मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 1 जुलै 2025 असून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक सोमवार, दिनांक 16 फेब्रुवारी 2026 आहे. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी सोमवार, दिनांक 16 फेब्रुवारी 2026 ते शुक्रवार दि. 20 फेब्रुवारी 2026 असा आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक मंगळवार, दि. 24 फेब्रुवारी 2026 आहे.

            राज्य निवडणूक आयोगाकडील दिनांक 29 जानेवारी 2026 रोजीच्या पत्रानुसार राज्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य / थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादी कार्यक्रम राबविणे क्रमप्राप्त आहे. दिनांक 31 जानेवारी 2026 पर्यंत उक्त कारणांमुळे रिक्त होणाऱ्या थेट सरपंच/सदस्यांच्या जागांचा समावेश सदर मतदार यादी कार्यक्रमात करण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!