भाजपाच्या उमेदवारांचा वसगडे, माळवाडी येथे प्रचाराचा शुभारंभ ; सुनिता गायकवाड, प्रा.डॉ. महेश पाटील (सर), मंजुषा पाटील यांना निवडून देण्याचा निर्धार ; जोरदार प्रचार






दर्पण न्यूज भिलवडी/पलूस :-
सांगली जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या निमित्ताने
भिलवडी जिल्हा परिषद गट, दोन पंचायत समिती गणातील भाजपा उमेदवारांचा वसगडे माळवाडी येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार केला.भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार
सुनिता शिवाजी गायकवाड भिलवडी पंचायत समिती गण, प्रा.डॉ. महेश रंगराव पाटील (सर) भिलवडी जिल्हा परिषद गट, मंजुषा धोंडीराम पाटील वसगडे पंचायत समिती गण यांचा समावेश आहे. या उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्या, असे आवाहन उपस्थित ग्रामस्थांना केले.यावेळी भिलवडी जिल्हा परिषद गट, भिलवडी पंचायत समिती गण, वसगडे पंचायत समिती गणातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिलवडी जिल्हा परिषद गटात आणि भिलवडी, माळवाडी पंचायत समिती गणातील भाजपा उमेदवारांना निवडून देण्याच्या घोषणा देण्यात आल्या.




