भिलवडी हनुमान मंदिर येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणाच्या उमेदवारांचा धुमधडाक्यात, जल्लोषात प्रचार शुभारंभ ; काँग्रेसमध्ये उत्साह
भिलवडी मुख्य बाजारपेठ येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

दर्पण न्यूज भिलवडी/पलूस (अभिजीत रांजणे) :-
सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे
भिलवडी जिल्हा परिषद गट, दोन पंचायत समिती गणाचे उमेदवार यांनी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत भिलवडी हनुमान मंदिर येथे धुमधडाक्यात जल्लोषात प्रचार शुभारंभ केला. या शुभारंभ प्रसंगी काँग्रेस मध्ये उत्साह दिसून आला.भिलवडी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार
पंचायत समिती- भिलवडी गण
हजराबी बालेचाँद सलामत, जिल्हा परिषद – भिलवडी गट प्रतिक संग्राम पाटील, पंचायत समिती- वसगडे गण
शोभा आनंदा हजारे यांनी मनोगत व्यक्त केले.दरम्यान, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजू दादा पाटील यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रचार शुभारंभास काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ‘हात’ या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन अनेकांनी केले





