महाराष्ट्रराजकीय

येळावी जि प मतदारसंघात रश्मीताई भंडारे यांची उमेदवारी

संदेश भंडारे यांच्या कामाची पोचपावती जनता देणार

 

दर्पण न्यूज भिलवडी पलूस :-  येळावी मतदारसंघात कुणाची मक्तेदारी नसून घराणेशाहीला जनता कंटाळली आहे, सौ रश्मीताई भंडारे यांची उमेदवारी कुणाला पाडण्यासाठी नसून जनशक्ती विरुद्ध घराणेशाही अशी असणार आहे, कोणतेही पद नसताना असंख्य विकास कामे केली जाऊ शकतात हे संदेश भाऊंनी दाखवून दिले आहे, मतदान मिळेल म्हणून कामे केलीत असे नाही तर लोकांच्या हितासाठी सोई व्हाव्यात म्हणून बस स्टॅन्ड, रस्ते, रुग्णसेवेसाठी ऍम्ब्युलन्स अशी कित्येक कामे केली, संपूर्ण जिल्हाभर कामाचा माणूस म्हणून संदेशभाऊ भंडारे यांची ओळख आहे. अभ्यासू आणि तडफदार नेतृत्व असलेले संदेशभाऊ भंडारे आपल्या भागासाठी उपयुक्त ठरणार आहेत. जिल्हा परिषद मतदार संघातील येळावी, नेहरूनगर, जुळेवाडी, निमणी, तुरची, नागाव, वासूंबे, निमणी राजापूर, बेंद्री या सगळ्या गावामध्ये निर्णायक मतदार संदेशभाऊंच्या पाठीशी राहतील असे चित्र आहे. सौ रश्मीताई भंडारे यांनी उमेदवारी केली आहे कदाचित त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी मिळू शकेल.
येळावी गाव संपूर्ण पणे काँग्रेस चे उमेदवार अमित पाटील यांच्या पाठीशी उभे राहील असे नाही, किमान चाळीस टक्के मतदान रश्मीताई भंडारे घेऊ शकतात, राहिला प्रश्न बाकीच्या गावांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात विभागणी होऊन आबा काका गटाची मते सुद्धा रश्मी ताईंना मिळू शकतात, नेहरूनगर, निमणी नागाव आणि तुरची जुळेवाडी, बेंद्री गावातील कोणी उमेदवार नसल्यामुळे याठिकाणी पाटील नको असलेल्या सर्वांनाच रश्मीताई भंडारे यांचा पर्याय पहिल्या पसंदीला आहे. बेंद्री सारख्या महत्वाच्या गावांत संदेशभाऊंनी दहा कोटींचा रस्ता आणला आहे हे सर्वज्ञात आहे, कामाचा माणूस म्हणून लोकप्रिय असलेल्या संदेश भाऊंना सगळ्या गावातून प्रतिसाद मिळणार आहे, पद असो नसो विकासासाठी निधी कसा आणायचा हे गणित सोडवणारे नेतृत्व संदेशभाऊ अशी प्रतिमा असल्याने मतदार नक्कीच इतरांना धक्का देत पर्याय उभा करतील अशी खात्री आहे. पैसा पेरून सत्ता घ्यायची आणि सत्तेतून पुन्हा पैसा मिळवायचा, लोकांना झुलावायचं, निवडणुकीत हात जोडायचे आणि निवडणूक झाली कि मागे मागे फिरवायचे अशी अवस्था करणारे काँग्रेस राष्ट्रवादी चे प्रस्थापित उमेदवार मतदार स्वीकारतील कि सर्वसामान्य घरातील सेवक म्हणून रश्मीताईना जिल्हा परिषद सदस्य म्हणून स्वीकारतील हे स्पष्ट होणार आहे. निवडणूक आली म्हणून जनसंपर्क वाढवणारे उमेदवार, आणि कायम जनतेचे बारीक सारीक कामं करणारे संदेशभाऊ यांच्यात लढाई होईल बाजी कोण मारेल याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. संदेशभाऊंच्या प्रयत्नातून नेहरू नगर निमणी राजापूर तुरची येळावी जुळेवाडी नागाव वासूंबे या मतदारसंघातील गावामध्येच नाही तर जिल्हाभर दलित वस्त्यामध्ये केंद्र व राज्य शासनाने निधी दिला, वंजारवाडी येथे बस स्टॉप कवलापूर येथील बस स्टॉप, बेघर लोकांना घरे देणे, महापुराच्या काळात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला बोटी साठी 50 लाखाचा फंड दिला, वाळव्यातील पूरबाधित क्षेत्रात बांध घालणे असो किंवा दुष्काळी जत तालुक्यातील गावोगावी पाण्याच्या टाक्या देण्याचं काम असा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न संदेश भंडारे यांनी केला आहे. या कामाच्या बळावरच जनता कौल देईल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!