भिलवडी येथे आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत सर्वरोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सांगलीचे सहकार्य : मान्यवरांनी उपस्थिती

दर्पण न्यूज
भिलवडी :-
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे माजी मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सांगली यांच्यावतीने मोफत सर्वरोग निदान शिबीर संपन्न झाले. सरपंच स्वप्नाली कुरणे व गावातील नेते मंडळी यांच्याहस्ते प्रारंभ झाला. हनुमान मंदीरात झालेल्या या शिबिरात सुमारे ३०० रुग्णांनी तपासणी करून घेतली.
स्व. डॉ. पतंगराव कदम यांची जयंती व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त याचे आयोजन केले होते. सर्व प्रकारच्या रोगांची तपासणी करण्यात आली. यासाठी वैद्यकशास्त्र, त्वचारोग, अस्थिरोग, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा नेत्रचिकित्सा यावरील तज्ञ डॉक्टरांची टीम आली होती. येथे आलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी किंवा शस्त्रक्रिया करायची असेल तर भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. येथे सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार आहे अशी माहिती हॉस्पिटलचे पीआरओ मनोज पाटील यांनी दिली.



