महाराष्ट्रसामाजिक

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

 

 दर्पण न्यूज धाराशिव (प्रतिनिधी संतोष खुने ) :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) रद्द करून नवीन VB-GRAM-G अधिनियम अमलात आणण्याच्या निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेस पार्टीच्यावतीने लाक्षणिक धरणे आंदोलन दि.९ जानेवारी रोजी करण्यात आले. केंद्राने घेतलेला तो निर्णय तात्काळ रद्द करावा. अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन चिडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही सन २००५ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारने लागू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश गामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी किमान १०० दिवसांचा रोजगार देण्याची कायदेशीर हमी देणे हा होता. तसेच रोजगाराची मागणी केल्यानंतर १५ दिवसांच्या आत रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य शासनावर निश्चित करण्यात आली होती. या योजनेमुळे देशभरातील सुमारे ५ ते ६ कोटी ग्रामीण कुटुंबांना दरवर्षी रोजगार मिळत होता. त्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होऊन स्थलांतराला आळा बसला. तसेच गोरगरीब, शेतमजूर, महिला व मागासवर्गीय घटकांना आर्थिक आधार मिळाला. मात्र, नवीन VB-GRAM-G अधिनियम अमलात आणण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या नव्या कायद्यामुळे ग्रामीण व गोरगरीब जनतेच्या रोजगाराच्या हमीवर गंभीर परिणाम होणार आहे. तसेच या अधिनियमामुळे राज्य शासनाचे अधिकार कमी करून बहुतांश अधिकार केंद्र शासनाकडे केंद्रीत करण्यात येत असल्याची भिती देखील व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संघराज्य व्यवस्थेच्या तत्वालाही बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. मनरेगा योजना ही केवळ रोजगार योजना नसून ग्रामीण भारताच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेचा कणा आहे. ती रद्द केल्यास कोट्यावधी कुटुंबे उपजिवीकेपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण होईल. त्यामुळे आपण आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून मनरेगा योजना रद्द करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याबाबत केंद्र सरकारला निर्देश द्यावेत व ग्रामीण जनतेच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी केली आहे. जर या मागणीचा विचार नाही केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र सहप्रभारी रेहना चिस्ती, जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील, ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, मी काय खाली आहे प्रदेश सरचिटणीस डॉ स्मिता शहापूरकर, पांडुरंग कुंभार, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, ज्येष्ठ जिल्हाध्यक्ष खलील सय्यद, बेंबळीचे सरपंच सत्तार शेख, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, धाराशिव शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, तुळजापूर तालुकाध्यक्ष रामचंद्र आलुरे, धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर, धाराशिव जिल्हा बँकेचे संचालक महबूब पाशा पटेल, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, नगरसेवक अक्षय जोगदंड, जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे, तनुजा हड्डा, सुरेखा जगदाळे, सरफराज काझी, वाशी तालुकाध्यक्ष गपाट, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धवलसिंह लावंड, कपिल सय्यद, संजय गजधने, सचिन धाकतोडे, सुनील बडूरकर, जुबेर शेख, मलंग शेख, गोविंद हरकर, बापू खटके, प्रभाकर डोंबाळे, प्रेमानंद सपकाळ, माजी नगरसेवक मुहीब शेख, विलास शाळू, सलमान शेख, गौरीशंकर मुळे, संकेत पडवळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!