महाराष्ट्रराजकीय

पलूस नगरपालिकेत काँग्रेसच्या गट नेतेपदी गणपतराव पुदाले यांची निवड

 

दर्पण न्यूज पलूस (अभिजीत रांजणे);-
पलूस नगरपालिकेत काँग्रेसच्या गट नेतेपदी नगरसेवक व सोनाई चँरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव पुदाले यांची निवड करण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, दिवंगत आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे. पलूस पालिकेत पुन्हा काँग्रेस पक्षाकडे जनतेने सत्ता दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपतराव पुदाले यांची पालिकेतील काँग्रेसचे गटनेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पलूस शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.
यावेळी गणपतराव पुदाले म्हणाले, आमदार डॉ. विश्वजीत कदम, महेंद्र लाड, काँग्रेसचे सर्व नेते, नगरसेवक यांनी नगरपालिकेच्या गटनेतेपदी माझी निवड केली. पुढील पाच वर्षात सर्वांना बरोबर घेऊन, पालिकेचा कारभार आदर्शवत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.
यावेळी पलूस बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले, माजी गटनेते सुहास पुदाले, विक्रम पाटील, गिरीश गोंदिल, विशाल दळवी, भरत इनामदार, के. डी. कांबळे, प्रकाश पाटील तसेच नूतन नगराध्यक्षा संजीवनी पुदाले, नगरसेवक अमोल भोरे, विजय जाधव, रोहित दळवी, अनिल कांबळे, धिरज घोरपडे, शहाजी मोरे, संगिता गायकवाड, कोमल सदामते, सारिका खारकांडे, कविता पाटील, राजनंदीनी मोटकट्टी, प्राजक्ता पाटील, शकुंतला माळी, पूजा शेंडगे तसेच, जगदीश पाटील, नितीन खारकांडे व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!