परिवहन विभागाच्या मिरज आगारात अपघात सुरक्षितता अभियानाचा शुभारंभ

दर्पण न्यूज मिरज / सांगली : अपघात सुरक्षितता अभियानांतर्गत राज्य परिवहन महामंडळातील सर्व आगारांमध्ये चालक व यांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यात येते. या अनुषंगाने दि. 1 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत राज्य परिवहन मिरज आगार, सांगली विभाग येथे अपघात सुरक्षितता अभियान 2026 राबविण्यात येत असून या अभियानाचा शुभारंभ नुकताच पार पडला.
मिरज आगार येथे राज्य परिवहन महामंडळातील वरिष्ठ अधिकारी रमेश कांबळे, यंत्र अभियंता (चा), विभागीय कार्यशाळा, राज्य परिवहन सांगली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अभियानाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, आगार व्यवस्थापक वरिष्ठ अश्विनी किरगत, विभागीय भांडार अधिकारी रेश्मा चौगुले, सहाय्यक वाहतुक अधिक्षक शुभांगी पाटील तसेच आगारातील सर्व पर्यवेक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी अपघात सुरक्षितता अभियान २०२६ च्या अनुषंगाने ‘रस्ते मोटार वाहन अपघात व सुरक्षितता’ व ‘अपघात व सुरक्षितता उपाय योजनांची आवश्यकता’ या प्रमुख विषयावर पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांनी आगारातील चालक व यांत्रिक कर्मचारी यांना मार्गदर्शन व प्रबोधन केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे प्रवाशांची सुरक्षित वाहतुक सेवा करणारे महामंडळ आहे. राज्य परिवहन बसेसचे अपघात टाळण्यासाठी महामंडळाकडुन नियतमीतपणे अपघात नियंत्रण उपाययोजना करण्यात येत असतात. दरवर्षी जानेवारी महिन्यात राज्यभरात अपघात सुरक्षित अभियान राबविण्यात येते.



