क्राईमग्रामीणमहाराष्ट्र
उसाची मोळी अंगावर पडल्याने राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू


दर्पण न्यूज कोल्हापूर, अनिल पाटील
राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे उसाची मोळी अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. संजय भरत कोळी वय 42 राहणार..घोटवडे तालुका राधानगरी असे त्यांचे नाव आहे. ही घटना आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास नाळवा नावाच्या शेतात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की मयत संजय भरत कोळी यांच्या शेतात ऊस लागणीसाठी दुसऱ्याच्या शेतातून ऊसाची मोळी डोक्यावरून घेऊन येत आसताना त्यांचा बांधावरून तोल गेल्याने ते खाली बेशुद्ध अवस्थेत पडलेत,. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात आणले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले,, पत्नी असा परिवार आहे.
या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे



