IFFI 56 : जीवन आणि व्हीएफएक्स : एकाच चित्रपटरुपी नाण्याच्या दोन बाजू – पीट ड्रेपरने यांनी इफ्फी 2025 मध्ये उलगडले जादूचे रहस्य
सर्वोत्तम व्हीएफएक्स वास्तवाची जागा घेत नाही; तर वास्तवाला अधिक प्रभावी, उठावदार बनवते : पीट ड्रेप

दर्पण न्यूज गोवा पणजी (अभिजीत रांजणे):-जीवन आणि व्हीएफएक्स हे केवळ सहकारी नाहीत – तर ते जणू ब्रम्हांडाचे सह-षड्यंत्रकार आहेत. एक वास्तवाची चौकट तयार करते तर दुसरा त्याला वाकवतो; आणि दोघे मिळून, कल्पनाशक्तीला भव्य रंगपट अनुभवात रूपांतरित करतात. आणि आज इफ्फी 2025 मध्ये, या दोन्ही विश्वांमध्ये सहजतेने वावर करणारे व्हीएफएक्स किमयागार पीट ड्रेपर – यांनी “द कम्प्लीट व्हीएफएक्स प्रोडक्शन मॅग्नॅनिमिटी” या त्यांच्या आकर्षक मास्टरक्लाद्वारे संपूर्ण महोत्सव उजळून टाकला.
25 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव तसेच बाहुबली, ‘आर आर आर’ आणि ‘इगा’ सारख्या हिट चित्रपटातील अप्रतिम कामगिरीसह, ड्रेपर यांनी प्री-प्रॉडक्शन पासून पोस्ट-प्रॉडक्शन पॉलिशपर्यंत ब्लॉकबस्टर व्हिज्युअल इफेक्ट्सच्या जगाची अतिशय वेगवान पण तपशीलवार सफर घडवली. दिग्दर्शक, व्हीएफएक्स कलाकार आणि चित्रपटप्रेमी त्यांच्या कल्पनांना वास्तवात.. आणि तेही विस्मयकारक वास्तवात रूपांतरित करण्याचे रहस्य ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“सर्वोत्तम व्हीएफएक्स वास्तवाची जागा घेत नाही, तर ते वास्तवाला अधिक उठावदार बनवते. प्रत्येक पोशाख, कॅमेरा अँगल, प्रॉप आणि फ्रेम महत्त्वाची आहे. सगळी कामे पोस्ट-प्रॉडक्शनकडे ढकलली तर गोंधळ होतो, खर्चात वाढ होते आणि अविरत बदल करावे लागतात,” असे ड्रॅपर म्हणाले.
त्यांनी सिनेमाई जादू निर्माण करणाऱ्या अत्यंत बारकाईच्या नियोजनाची उदाहरणे दाखवली : दृश्यागणिक स्क्रिप्ट ब्रेकडाऊन, लेन्सिंग आणि कॅमेरा मूव्हजचे प्री-व्हिज्युअलाइझेशन, प्रॉप्स आणि डिजिटल डबल्स मिलिमीटर स्तरावर स्कॅनिंग आणि जास्तीत जास्त प्रभावासाठी लेयर्ड शॉट्सची कमाल प्रभावासाठी आखणी, अगदी रिअल टाइममध्ये आग आणि गर्दीचे नियंत्रण यांचा त्यात समावेश होता. ड्रॅपर यांनी धबधब्याच्या दृश्यामध्ये ऑन-द-स्पॉट समस्या सोडवल्या, महत्वाचे बिट्स काही मिनिटात ब्लॉक, टेस्ट आणि लॉक केले, ज्यामुळे पोस्ट-प्रॉडक्शनचा वेळ वाचला- हे देखील त्यांनी डेमोद्वारे दाखवले.
सहकार्य हीच खरी सुपरपॉवर – दिग्दर्शक, छायाचित्रकार आणि व्हीएफएक्स चमू यांच्यातील निर्दोष समन्वयामुळे प्रत्येक शॉट कलात्मक दृष्टिकोनाशी अचूक जुळतो, याची खात्री होते. लेन्स मेटाडेटा लॉग करणे किंवा सीन मधील अनावश्यक केबल साठवणे यासारख्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टीही पोस्ट प्रोडक्शनमध्ये जाणारा काळ वाचवू शकतात, यावर त्यांनी भर दिला.

स्टोरीबोर्डपासून ते पुनरावृत्तीपूर्ण संकल्पना निर्मितीपर्यंत, क्राउड सिम्युलेशन ते निर्बाध डिजिटल विस्तारांपर्यंत, ड्रेपरने हे सिद्ध केले की व्हीएफएक्स हे केवळ पिक्सेलबद्दल नसते तर ते धोरण, नियोजन आणि संघकार्यही असते.
सत्राचा समारोप करताना, ड्रेपर यांनी उपस्थितांना आठवण करून दिली: “हुशारीने योजना करा, प्रत्येक गोष्ट लॉग करा आणि असे सहकार्य करा जणू तुमचा चित्रपट त्यावरच अवलंबून आहे – कारण तो खरोखरच सहकार्यावर अवलंबून असतो. व्हीएफएक्स म्हणजे जादू, पण ती काळजीपूर्वक साकारली तरच.”
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.



