कोल्हापूर प्रमाणे सांगली जिल्हाधिकारी यांनी साखर कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक बोलावून ऊस दरासाठी योग्य निर्णय घ्यावा ; संदीप राजोबा

दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस:-
कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमाणे सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेत शेतकऱ्यांच्या ऊस दरासाठी बैठक बोलून योग्य सर्वमान्य निर्णय करावा, अशी मागणी जिल्हा कार्याध्यक्ष स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे
संदीप राजोबा केली आहे.संदीप राजोबा यांनी सांगितले की,
चालू सालामध्ये गाळप होणाऱ्या
उसाला प्रतिटन विना कपात ₹३७५१ दर मागील हंगामातील ₹२०० हप्ता दिल्याशिवाय गळीत हंगाम सुरू सुरू करू नये असे असे”स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा खा राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या २४व्या ऊस परिषदेत मांडलेल्या भूमिकेचा पाठपुरावा करत ही मागणी करण्यात आली. गेल्या वर्षभरात साखरेचा दर ₹३८०० प्रति क्विंटलपर्यंत गेला असून, इथेनॉल, अल्कोहोल, बगॅस, मोलॅसिसमधून कारखान्यांनी कोट्यवधींचा नफा कमावला आहे. तरीदेखील शेतकऱ्यांना न्याय्य दर न मिळणे ही शेतकऱ्यांच्या मेहनतीचा अपमान आहे, असे संघटनेने ठामपणे नमूद केले.
तसेच २५ किलोमीटरपर्यंतच वाहतूक कपात मर्यादित ठेवावी आणि “२५ किमी क्षेत्रासाठी ₹७५० कपात मान्य, त्यापलीकडील वाहतूक खर्च शेतकऱ्यांवर टाकू नये,” अशी मागणी करण्यात आली.
स्वाभिमानी संघटनेने जिल्ह्यातील सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना प्रत्यक्ष भेटून वरील मागण्यांचे निवेदन दिले असून येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत वरील मागण्या मान्य कराव्या अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही अशा आशयाचे निवेदन यापूर्वी दिलेले आहे परंतु जिल्ह्यातील एकाही साखर कारखानदाराने ऊसदराची घोषणा अथवा सकारात्मक भूमिका जाहीर केलेली नाही साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यातील ऊस दरामुळे होणारा संघर्ष व कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावे यासाठी जिल्हाधिकारी या नात्याने आपण कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्याची उद्या दिनांक 3 रोजी साखर कारखान्याचे चेअरमन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दराबाबत बैठक आपल्या कार्यालयात घेऊन चर्चेतून योग्य तो तोडगा काढण्यासाठी बैठक घेतलेली आहे त्याच धर्तीवर सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा सांगली जिल्ह्यासाठी कोल्हापूर प्रमाणे बैठक घ्यावी ही विनंती उद्या सोमवार दिनांक 3 रोजी प्रत्यक्ष भेटून विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती
संदीप राजोबा
जिल्हा कार्याध्यक्ष स्वाभिमानी
शेतकरी संघटना यांनी दिली.


