देश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
सांगली रेल्वे स्टेशन येथून सिंदूर महारक्तदान यात्रेस प्रारंभ : उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती
डबल महाराष्ट्र केसरी पै चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेले देशातील पहिले महारक्तदान यात्रा ; युवकांचा उत्स्फूर्त सहभाग




दर्पण न्यूज सांगली /मिरज -: डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि देशातील पहिले महारक्तदान यात्रेला मंगळवार दिनांक 5 रोजी प्रारंभ झाला. जम्मू काश्मीर येथे रक्तदान करण्यासाठी निघालेल्या धर्मवीर एक्सप्रेस चा शुभारंभ उद्योगमंत्री मा.ना.उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
सांगली रेल्वे स्टेशन येथे सिंदूर महारक्तदान यात्रेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील 1000 युवक जम्मू काश्मीर येथे आर्मीसाठी रक्तदान करण्यासाठी निघालेले आहेत.धर्मवीर एक्सप्रेसच्या शुभारंभ प्रसंगी उदय सामंत, पै चंद्रहार पाटील यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या महारक्तदान यात्रेत सहभागी झालेल्या रक्तदात्यांची रेल्वेच्या डब्यात जावून पै चंद्रहार पाटील यांनी आपुलकीने विचारपूस केली.
अतिशय नेटकं नियोजन करण्यात आले आहे.


