पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज मिरज / सांगली -: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार, दि. 18 ऑक्टोबर 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.15 वाजता मौजे आलास, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथून सांगलीकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6 वाजता काले चेतक, भारती हॉस्पिटल, पार्श्वनाथ नगर बस स्टॉप जवळ, सांगली-मिरज रोड, सांगली येथे आगमन व काले बजाज चेतकच्या नव्या शोरूमच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. सायंकाळी 6.30 वाजता माळी वस्ती, अभयनगर सांगली येथे आगमन व संजय सावंत यांच्या घरी सांत्वनपर भेट. सायंकाळी 6.45 वाजता विजय बंगला, सांगली-मिरज रोड, विश्रामबाग, सांगली येथे आगमन व जयश्रीताई पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. रात्री 7.45 वाजता श्री विघ्नहर सहनिवास, सिटी हायस्कूल रोड, गावभाग, सांगली येथे आगमन व शरद नलवडे यांच्या घरी सदिच्छा भेट. रात्री 8.30 वाजता कदम बंगला, शिवाजीनगर, मिरज येथे आगमन व समित कदम यांच्या घरी सदिच्छा भेट. रात्री 9.20 वाजता मिरज रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 9.40 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. रात्री 9.50 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने पुणेकडे प्रयाण.


