सांगली महानगर पालिका वाॅर्ड 17 मधून ज्यूनिअर रजनीकांत ऊर्फ बसवराज पाटील यांना संधी द्यावी : लोकांची मागणी







दर्पण न्यूज मिरज सांगली (अभिजीत रांजणे)
महाराष्ट्र राज्याला परिचित असणारे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे ज्युनिअर रजनीकांत उर्फ बसवराज पाटील यांना सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 17 मधून लोकांची समाज सेवा करण्यासाठी संधी द्यावी अशी मागणी सांगली परिसरासह वाड मधील 17 बंधू आणि भगिनींमधून होत आहे.
जूनियर रजनीकांत उर्फ बसवराज पाटील हे जरी व्यवसायाने टेलरिंग व्यवसाय करत असेल तरी गेला वीस वर्षापासून सामाजिक जाण असणारा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहिले जात आहे. बसवराज पाटील यांनी वार्ड नंबर 17 मधील बापट मळा गार्डनचे शुशोभीकरण करणे तेथील हनुमान जयंतीनिमित्त सातत्याने सहभाग दर्शवणे आणि ती पुढाकाराने, स्वखर्चाने लोकसभागातून करणे हे आम्ही पाहिले आहे. भारतीय संस्कृतीचा वारसा जपत ते वट सावित्री पौर्णिमा साजरी करताना महिलांना एक आदर्श देत आहेत. गोरगरिबाचा कैवारी असेही त्यांना संबोधले जाते. एखांदा गरजू गरीब त्यांच्याकडे आला तरीही ते आत्मीयतेने त्याची विचारपूस करून मदत करण्याचे कार्य करतात. शैक्षणिक सामाजिक क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील त्यांना गाडा अभ्यास असल्याने महाराष्ट्र राज्य टेलर वेलकरी असोसिएशन महाराष्ट्र राज्य ते राज्याध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील टेलर व्यावसायिक लोकांना त्यांनी एकजुटीने न्याय मिळवून देण्याचं कार्य केलेला आहे.
बसवराज पाटील नियमित सामाजिक कार्य करत असल्यामुळे येणाऱ्या काळात सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 17 मधून त्यांना संधी द्यावी अशा मागण्या लोकातून जोर धरत आहेत.


