जायंट्स सहेली भिलवडीच्या फूड फेस्टिव्हलास उत्स्फूर्त प्रतिसाद






जायंट्स सहेलीचा भिलवडी फूड फेस्टिव्हल प्रचंड प्रतिसादात संपन्न.
दर्पण न्यूज भिलवडी -: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 ते 10 या वेळेत जायन्ट्स सहेली व सौ. भक्ती चितळे प्रस्तुत ‘भिलवडी फुड फेस्टिव्हल ‘ 2025, पाटील डेअरी हॉल माळवाडी येथे महिलांच्या अफाट गर्दीत संपन्न झाला. जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेली यांनी त्यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थापिका अध्यक्षा सौ. सुनीता चितळे व सर्व माजी सहेली अध्यक्षांचा व फेडरेशन वरती सेवा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
पेंटिंग प्रदर्शनचे उद्घाटन सौ अपर्णा संग्राम देशमुख व राजेश चौगुले फाउंडेशनच्या सौ. शितल चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये विणा ताई सहस्त्रबुद्धे / चितळे यांच्या एक्रिलिक्स ऑन कैन्वस ज्यामध्ये नेचर पेंटिंग्स, इजिप्शियन पेंटिंग्स ,मिनिएचर, फ्लोरल मोटिफ्स असे विविध प्रकारच्या पेंटिंग्स चा डिस्प्ले केला होता.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे भिलवडी व परिसरातून 11 महिला डान्स ग्रुपनी आपल्या नृत्याविष्काराने उपस्थित अडीच ते 3 हजार महिलांना मंत्रमुग्ध करून टाकले व या कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.सांगलीच्या प्रियांका कार्लेकर आणि टीम यांनी उत्तम अँकरिंग चे काम केले. या स्पर्धेमध्ये अनुक्रमे शिवकन्या डान्स ग्रुप भिलवडी, नारायणी डान्स ग्रुप नांद्रे, मैत्री कट्टा डान्स ग्रुप भिलवडी यांनी बक्षिसे पटकवली तर उत्तेजनार्थ सखी ग्रुप , लक्ष ग्रुप अंकलखोप यांनी बाजी मारली. प्रचंड गर्दीमुळे बरेच लोक बाहेरील विविध फूड स्टॉल वरती ताव मारत या कार्यक्रमाचा आनंद लुटत होते. सर्वच फुड स्टॉल वरती प्रचंड गर्दी होती त्यामुळे स्टॉल धारक ही समाधानी होते. या कार्यक्रमादरम्यान स्पॉट गेम्स द्वारे 100 साड्या व तीनशे ते चारशे इतर बक्षिसे उपस्थित महिलांनी जिंकली .
हा कार्यक्रम पार पडण्यासाठी पीएनजी ज्वेलर्स, चितळे डेअरीचे संचालक श्री गिरीश व मकरंद चितळे , सौ धनश्री लाड, सौ भारती चोपडे , सौ सुनीता चितळे ,नांदणी बँक, कीर्ती सेल्स मोबाईल शॉपी , चितळे आईस्क्रीम पुणे, अध्यक्ष श्री महावीर चौगुले व सहेली अध्यक्षा सौ सविता चौगुले, दत्ता उतळे महावीर नवले, सौ स्मिता सुबोध वाळवेकर, सौ सीमा शेटे यांनी सहकार्य केले.


