सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे 12 जून 2026 रोजी राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब यांची आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. पत्रकार शशिकांत राजवंत यांचे हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर ग्रंथपाल मयुरी नलवडे मुख्य लेखनिक विद्या निकम यांचे हस्ते राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यवाह सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून जिजाऊ आईसाहेबांनी शिवरायांच्या मनावर स्वराज्याचे नैतिकतेचे आणि प्रजा हित दक्षतेचे संस्कार केले, त्यामुळेच पुढे महाराज घडले तर विवेकानंदांनी जगाला मानवता धर्माची शिकवण दिली असे विचार व्यक्त केले .
जयंत केळकर यांनी आभार मानले. याप्रसंगी जी जी पाटील वाचक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



