भिलवडीत अर्ध्यात रखडलेल्या विकासकामांमुळे नागरिक हैराण ; प्रशासनाचे जाणूनबुजून दुर्लक्ष?
विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी ; काही संघटना आंदोलनाच्या पवित्रांमध्ये

भिलवडी ; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे अनेकांना वशिलेबाजीने दिलेल्या विकासकामांचे टेंडर अनेक ठिकाणी अर्ध्यात रखडलेले आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्षच केले असल्याची आणि नुसतीच कुदळ मारून गेल्याने विकासकामे कधी होणार, अशी चर्चा नागरिकांतून सुरू आहे.
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी गावामध्ये सर्वांगीण विकासाच्या नावाखाली अनेक बगलबच्चांना टेंडर देऊन नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. काही कंत्राटदार भिलवडी मध्ये नुसतेच टेंडर घेऊन विकासकामाच्या नावाखाली लोकांची गैरसोय करत आहे. तर काही कंत्राटदार लोकांच्या त्रुटी सांगत घेतलेले कंत्राट अर्ध्यावरच सोडून दिल्याने महिनोन्महिने काम पूर्ण करत नाहीत, असा प्रकार अनेक ठिकाणी भिलवडी परिसरामध्ये दिसत आहे. भिलवडी गावांमध्ये टेंडर कुणालाही मिळूदे पण भिलवडी गावचा सर्वांगीण विकास व्हावा, अशीच मानसिकता भिलवडीकरांची असते. परंतु भिलवडी गावातील अनेक ठिकाणी अर्ध्यावर सोडून दिलेल्या विकास कामांमुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. या कामासाठी प्रशासकीय अधिकारी जाणूनबजून दुर्लक्ष करीत असल्याची चर्चाही लोकांतून होत आहे.
भिलवडी गावातील ही अर्धवट सोडलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करावीत ,अशी मागणी ही लोकांतून जोर धरत आहे . तर काही संघटना याबाबत आंदोलनाच्या पवित्रांमध्ये आहेत.
(भाग १)