बार्शीतील रस्त्याच्याकडेला असलेली अवैध पशुहत्या बंद करावी ; अन्यथा आंदोलन छेडणार ; शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांचा इशारा

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) :-
बार्शी l बार्शीतील काही रस्त्यांच्या कडेला होत असलेली अवैध पक्षुहत्या त्वरीत बंद करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने ती बंद केली जाईल, असा इशारा शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलिस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे याबाबत त्यांनी लेखी निवेदन दिले असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात भगवंत नगरी बार्शी मध्ये प्रवेशद्वारा वरती (भवानी पेठ पोस्ट चौक) हिंदूंच्या धार्मिक भावना कोंबड्यांची कत्तल व उघडपणे मासे विक्री विदाऊट लायसन ने करत असलेल्या वर कारवाई करावी. आम्ही सुमारे १३ वर्षांपासून बार्शी शहरांमध्ये शिवसेनेचे काम शिवसैनिक म्हणून करत असून भगवंत नगरीत भगवंताचे साक्षात अस्तित्व आहे हजारो लोकांचं हे पवित्र ठिकाण आहे, बार्शी शहरात अनेक जैन, मारवाडी गुजराती, लिंगायत, ब्राह्मण व अनेक लोक शाकाहारी व धार्मिक वृत्तीचे असल्याने या ठिकाणी सर्वांच्या भावनांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जुने पोस्ट चौक जुने रेल्वे फाटक या ठिकाणी दोन्ही बाजूंनी पिंजऱ्यामध्ये कोंबड्या ठेवणे गिऱ्हाईकाला त्या कापून देताना उघडपणे त्याची कत्तल करणे त्याचे वाटे घालणे असा घृणास्पद प्रकार व हिंदूंच्या भावना दुखावणारा प्रकार घडत आहे त्याचप्रमाणे दोन्ही साईडला मासे प्रदर्शनासारखे मांडले जातात त्याची दुर्गंधी (वास) सर्व चौकामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक व भाविकास सहन करावा लागतो. माझ्या माय माऊली, माता-भगिनी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, जैन, बांधव असतील लिंगायत बांधव सर्वच बांधवांना महिला भगिनीला हा त्रास सहन करावा लागतो. त्यामध्येच भवानी पेठेमध्ये माझ्या आई तुळजा भवानीचे पवित्र पुरातन देवीचे मंदिर असून त्या ठिकाणी बहुसंख्य महिलांची ये जा वर्दळ चालू असते. आम्ही २ ते ४ वेळेला फेसबुक लाईव्ह घेऊन याबाबत तक्रार केलेली होती. त्यांना समज सुद्धा दिलेली होती परंतु ते बेकायदेशीर अतिक्रमण करून सरकारी जागेवर टपऱ्या टाकून कोणताही परवाना त्यांना नसताना उघडपणे रस्त्यावरती हात चाललेला कत्तलखाना मा. मुख्याधिकारी साहेबांना सुद्धा आम्ही बार्शी नगरपालिकेला सांगितलेला आहे तरीसुद्धा त्यावर कारवाई झालेली नाही यामध्ये बार्शी शहर तालुक्यातील हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रकार उघड उघड होत आहे. यामध्ये जातीय दंगल घडू शकते याची संपूर्ण जबाबदारी पोलीस खाते आणि बार्शी नगरपालिकेची आहे. आम्ही पोलीस खात्यात होतो म्हणून आम्ही शांततेने आणि अर्ज आणि विनंती करतोय. अन्यथा शिवसेना स्टाईलने त्या ठिकाणी गोंधळ घालून सर्व फेकाफेकी करून त्या ठिकाणी हे अवैध्य कत्तलखाना बंद केला जाईल त्या मध्ये कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. या अर्जाद्वारे आपणास दि. ५ जून २०२५ पर्यंत कारवाई संदर्भात मुदत म्हणजेच आमची अपेक्षा तोपर्यंत कारवाई करावी अशी आहे न केल्यास त्यानंतर शिवसेना स्टाईलने आम्हाला आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी , असेही शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी निवेदनात म्हटले आहे.