मिरज बालगंधर्व नाट्यगृहास विशेष अनुदान देण्याची सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांची मागणी

दर्पण न्यूज मिरज :- मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहास विशेष अनुदान देण्याची मागणी माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य आशिष शेलार यांच्याकडे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांनी मुंबई येथे केली असून याबाबत निवेदन ही त्यांनी दिले आहे.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांनी निवेदना म्हटले आहे की,
मिरजेच्या बालगंधर्व नाट्यगृहाचा इतिहास हा जुन्या हंसप्रभा नाट्यगृहाच्या नूतनीकरणाशी जोडलेला आहे, ज्यामध्ये बालगंधर्वांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. या ऐतिहासिक नाट्यगृहाला आधुनिक सुविधांनी युक्त अशा बालगंधर्व नाट्यगृहात रूपांतरित करण्यासाठी विशेष अनुदान मिळावे या नाट्यगृहामुळे मिरज शहर सांस्कृतिकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे बनेल. याची विशेष बाबा म्हणून ह्या बालगंधर्व नाट्यगृहास विशेष अनुदान मिळावे.असे निवेदनात जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांनी नमूद केले आहे.यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे, भाजपचे सम्राट महाडिक उपस्थित होते.