कृषी व व्यापारमहाराष्ट्र

रत्नागिरीत मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे पहिले शोरूम दाखल

 

 

कोल्हापूरः अनिल  पाटील

जबाबदार सराफ पेढी असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने, रत्नागिरीमधील त्याच्या नवीनतम शोरूमची आज अभिमानाने घोषणा केली. हे नवीन शोरूम तळ मजला, नवकर एन्क्लेव्ह, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे थाटण्यात आले आहे. एकंदर ४५०० चौरस फूटाचे क्षेत्रफळ आणि त्यातील विक्रीसाठी ३,६०० चौरस फूटाचे नक्त क्षेत्र असलेल्या या नवीन प्रशस्त विक्री दालनाची रचना ग्राहकांना विविध डिझाइन आणि शैलीतील दागिन्यांच्या उत्कृष्ट संग्रहाच्या खरेदीचा जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी खास केली गेली आहे. अपवादात्मक कारागिरी आणि सेवा अनुभूती देताना पश्चिम भारतातील पाऊलखुणा वाढविण्याच्या मलाबारच्या वचनबद्धतेचे हे नवीन दालनाचे उद्घाटन म्हणजे आणखी एक पुढचे पाऊल आहे.

हे नवीन शोरूम म्हणजे भारताच्या पश्चिम भागातील मलाबारच्या या ४६ वे विक्री दालन आहे, ज्यामुळे या प्रदेशातील उपस्थिती आणि नेतृत्व स्थान त्याने आणखी मजबूत केले आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंडसाठी रत्नागिरीमधील हे पहिलेच विक्री दालन आहे. नवीन शोरूमचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्राचे उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत, प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे, मलाबार समूहाच्या व्यवस्थापन संघाचे सदस्य, मौल्यवान ग्राहक आणि हितचिंतकांच्या सन्माननीय उपस्थितीत पार पडला.

भारत, पश्चिम आशिया, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यासह १३ देशांमधील ४०० हून अधिक शोरूमच्या जागतिक पदचिन्हांसह-मलाबार गोल्ड अँड डायमंड्स त्याच्या दागिन्यांचा विस्तृत आणि विपुल संग्रह, अपवादात्मक गुणवत्ता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध आहेत.

या नवीन शोरूममध्ये देखील सोन्याचे, प्लॅटिनम, रत्न व हिरे़जडित आणि चांदीच्या दागिन्यांचा विस्तृत संग्रह उपलब्ध आहे, ज्याची रचना विविध अभिरुची आणि प्रसंगांना अनुकूल केली गेली आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला प्रतिबिंबित करणाऱ्या पारंपारिक डिझाईन्सपासून ते आधुनिक संवेदनशीलतेला अनुरूप समकालीन शैलीपर्यंत, हे शोरूम ग्राहकांच्या विविध पसंती आणि प्राधान्यक्रमांना पूर्ण करत

मोहक प्रदर्शन सज्जांसह, ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या दागिन्यांची निवड करण्यासाठी परिपूर्ण मार्गदर्शन करणाऱ्या एक उच्च प्रशिक्षित विक्री संघासह नवीन शोरूम सुसज्ज असून, ग्राहकांना खरेदीचा उमदा अनुभव प्रदान करण्यासाठी त्याची विशेष अंतर्रचना करण्यात आलेली आहे. प्रशस्त जागेचे उद्दिष्ट हे ग्राहकांना एक अतुलनीय दागदागिने खरेदीचा अनुभव प्रदान करणे हे असल्याने ऐसपैस अंतर्भाग आणि बाहेर पुरेशा पार्किंगच्या सुविधेची सोयही पाहिली गेली आहे.नवीन शोरूमचे अनावरण हे मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या जगातील सर्वात पसंतीची सराफ पेढी बनण्याच्या दृष्टीकोनाला अधोरेखित करते. पारंपारिक कारागिरीला आधुनिक नाविन्यपूर्णतेची जो़ड देऊन कालातीत दागिन्यांचे नग तयार करण्यासह, मलाबार समूहाकडून सामाजिक कल्याणला देखील प्राधान्य दिले जाते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!