येडशी येथील जनता विद्यालयात विधी सेवा साक्षरता शिबिर उत्साहात

दर्पण न्यूज : संतोष खुने (येडशी )
:- येडशी येथील जनता विद्यालयात विधी सेवा प्राधिकरण धाराशिव व ग्रामीण पोलीस स्टेशन धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विधी साक्षरता शिबिरात विविध कायद्यांची माहिती देण्यात आली.या प्रसंगी *दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री वसंत यादव साहेब व धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक श्री चंद्रकांत बनसोडे यांनी मार्गदर्शन केले.*
बालविवाह प्रतिबंधक कायदा, नवीन बदलले कायदे,पोक्सो कायदा 2012, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सहाय्यक न्यायरक्षक अॅड . शशांक गरड साहेब यांनी नवीन बदलले कायदे यासंबंधी माहिती दिली.तर उपमुख्यन्यायरक्षक श्री अभय पाथरूडकर यांनी पोक्सो कायदा 2012 या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक श्री चव्हाण सर होते.कार्यक्रमासाठी विधी विभाग धाराशिव व ग्रामीण पोलीस स्टेशन धाराशिवचे कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद जाधव यांनी केले.