कृषी व व्यापारमहाराष्ट्र

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गत अडचणी सोडविण्यासाठी   प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधला संवाद

 

 

       दर्पण न्यूज  सांगली : जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल या कालावधीत  जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा होत आहे. या अनुषंगाने 18 व 19 एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या आवर्तन संबंधी भूसंपादन संबंधी अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.

या मोहिमेअंतर्गत टेंभू उपसा सिंचन योजनेमधील लिंक कॅनॉल 1 व 3 अंतर्गत कडेगाव व खानापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. टेंभू टप्पा क्रमांक 5 येथे विटा तालुक्यातील हिवरे व पळशी तसेच विस्तारित टेंभू योजनेअंतर्गत माण तालुक्यातील दोरगेवाडी, नरवणे काळेवाडी, किरकसल येथील शेतकऱ्यांना नवीन योजनांची माहिती देण्यात आली.

म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी येथील कालवा आवर्तना दरम्यान येणाऱ्या अडचणी सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी स्वत: जाणून घेतल्या.  याच योजनेअंतर्गत जत तालुक्यातील अंकले, देवनाळ, मुचंडी, टोणेवाडी, मायथळ, माडग्याळ, तिप्पेहळ्ळी, खैराव येथील शेतकऱ्यांच्या भूसंपादन विषयक समस्या जाणून घेतल्या. सांगोला तालुक्यातील घिरडी व मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी येथे शेतकऱ्यांच्या आवर्तन, भूसंपादन विषयक समस्या निवारणासाठी बैठका घेण्यात आल्या.

ताकारी योजनेअंतर्गत कुमठे, कवठेएकंद, मतकुणकी, मणेराजुरी, वासुंबे, उपळावी, जाधवनगर बलवडी येथे शेतकऱ्यांशी चर्चा करून तक्रार निवारण करण्यात आले. सांगली पाटबंधारे विभागामार्फत जयसिंगपूर, आष्टा, कारंदवाडी, इस्लामपूर, शिराळा येथे व नांद्रे, बुधगाव, घालवाड, कसबे- डिग्रज, वसगडे  को.प. बंधारा येथील पाणी वापर संस्थांशी चर्चा करण्यात आली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!