राधानगरी पोलिसांची धङक कारवाई ; आमजाई व्हरवङे””पिरळ येथे मोटरसायकलच्या सायलेंसरमधील पुंगळ्या काङून कर्कश आवाज करणार्या तीन मोटरसायकली घेतल्या ताब्यात

कोल्हापूरः अनिल पाटील
राधानगरी पोलीसांकडुन गणेश आगमण मिरवणुकीत डिजे लावुन नियमभंग करणा-या तसेच दुचाकी वाहनांच्या पुंगळ्या काढुन वाहने चालविणारे कार्यकर्त्यांवर कारवाई केली.
कोल्हापुर जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सव शांततेत पार पाडणेच्या अनुषंगाणे आगमन व विसर्जन मिरवणुकीमध्ये डिजे डॉल्बी वापराबाबत निर्बंध घालुन दिलेले आहेत. पोलीस अधीक्षक . योगेश कुमार यांनी देखील गणेशोत्व शांततेत पार पाडणेकामी सुचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाणे आज रोजी गणेश मुर्ती आगमन अनुषंगाणे राधानगरी तालुक्यात पोलीस बंदोबस्त तैणात केला होता. दरम्यान आमजाई व्हरवडे, पिरळ या गावामध्ये मिरवणुकीमध्ये दुचाकी गाडीच्या सायलेंसर मधील पुंगळ्या काढून कर्कश आवाज करुन गाडी चालविणा-या एकुण ०३ मोटारसायकल ताब्यात घेतल्या असुन संबंधीतांवर कोर्टात खटले पाठविणेत येणार आहेत. तसेच सरवडे गावामध्ये गणेश आगमन मिरवणुकीमध्ये डिजे डॉल्बीचा वापर केलेचे निदर्शनास आलेले असुन सरवडे येथील १० गणेश मंडळांचे साऊंडचे नमुने घेण्यात आलेले असुन त्यांचेवर देखील ध्वनी प्रदुषण अनुषंगाणे कारवाई करणेत येणार आहे. मिरवणुकीत खटले दाखल झालेस तरुणांचे पोलीस व्हेरीफीकेशन मध्ये नोंद होवुन त्याचा विपरीत परीणाम भविष्यावर होवु शकतो.
तरी सर्व गणेश तरुण मंडळानां आवाहन करणेत येते की, गणेशमुर्ती मिरवणुकी मध्ये कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदुषण होवु देवुन नये, स्वी नृत्यांगणा नाचवु नयेत तसेच लेसर लाईट वापरु नयेत अशा गोष्टींचा वापर टाळुन समाजपयोगी कार्य करावित मंडळांमध्ये सीसीटीव्ही बसवावे, ग्रंथालये उभारावेत. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, करीअर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सारखे उपक्रम राबवावे जेणेकरुन त्याचा समाजात त्याचा सदुपयोग होवुन आदर्श तरुण पिढी घडेल. असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी केले आहे.