विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या चंदगड तालुकास्तरीय जयंतीनिमित्त आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित अनिरुद्ध वनकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) चंदगड :- भारतीय संविधान सन्मान परिषद व भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्ष व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त चंदगड तालुक्याच्या वतीने दि. 21 एप्रिल रोजी अनिरुद्ध वनकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आज आयोजीत करण्यात आला होता. या भारतीय संविधान सन्मान परिषद व भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्ष निमित्त चंदगड तालुकास्तरीय जयंतीनिमित्त जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांनी या कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन ॲड. प्रा .एन.एस. पाटील (सर) , शिवाजीराव पाटील सो, सुभाष देसाई सो, रामदास इंगवले सो, राजेश चव्हाण, विश्वास पाटील, बाळासाहेब भोगे, रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी.आर कांबळे, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष दिलीप कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कांबळे यांची विशेष उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली संविधानाची निर्मीती, त्यांचा भारतातील सर्वसाधारण जनतेस झालेला फायदा तसेच संविधानाचे महत्व जपा व अंगीकृत करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांनी चंदगड तालुकास्तरीय जयंती निमित्त प्रसंगी मार्गदर्शन केले. प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला अभिवादन करुन संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी
शहरातील प्रतिष्ठीत नागरीक व भिमसैनिकांनी उपस्थिती दर्शविली होती.