महाराष्ट्रराजकीय
टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात

दर्पण न्यूज टाकळीभान : रयत शिक्षण संस्थेच्या, टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी टाकळीभान येथील प्रगतशील शेतकरी शशिकांत गाढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे , स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राहूल पटारे, मंजाबापू थोरात, सरपंच सौ अर्चनाताई रणनवरे , विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम . शिंदे , पर्यवेक्षक एस.एस . जरे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .