साहित्याचा व्यासंग वाढला पाहिजे : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनील कुमार लवटे
अंकलखोप येथे शब्दसूर साहित्य सांस्कृतिक मंच यांचे कोजागिरी साहित्य संमेलन 2024

अंकलखोप ; : ” भारत देशाला उध्वस्त करायचे कोणतेही क्षेत्र राहिलेले नाही. शिक्षण , राजकारण , समाजकारण सर्व क्षेत्रात समाज उध्वस्त अवस्थेत आहे. एखादा साहित्यिक उध्वस्त समाजाला सावरण्याचे काम करतो. साहित्यिक, पुस्तके हे काम करतील. प्रत्येक घरात पुस्तके व अन्य वाड्मयीन साहित्य किती आहे ? ते वाचले जाते का याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. अशी साहित्य संमेलने ठिकठिकाणी भरवली पाहिजेत. साहित्याचा व्यासंग वाढवत नेला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनील कुमार लवटे यांनी केले.
अंकलखोप येथे शब्दसूर साहित्य सांस्कृतिक मंच यांचे वतीने आयोजित कोजागिरी साहित्य संमेलन 2024 च्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी आमदार डॉ . विश्वजीत कदम सरपंच श्रीमती राजेश्वरी सावंत, रयतचे उपाध्यक्ष महेंद्र लाड , उद्योजक राजेश चौगुले , सत्यविजय बँकेचे अध्यक्ष प्रकाशराव पवार प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉक्टर कदम यांच्या हस्ते (स्व.) डॉ. पतंगरावजी कदम साहित्यरत्न पुरस्कार प्रा. इंद्रजीत भालेराव (ज्येष्ठ विचारवंत, परभणी) सौजन्य : सुभाष मगदूम मेमोरियल शिवशक्ती फाऊंडेशन, अंकलखोप, (स्व. ) कवी ज्ञानेश्वर कोळी साहित्य गौरव पुरस्कार. नवनाथ गोरे (युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त, जत ) , सौजन्य: स्व. मामासाहेब पवार सत्यविजय सहकारी बँक लि., कुंडल, (स्व.) डॉ. बापूसाहेब चौगुले समाजरत्न पुरस्कार. आनंद शिंदे Elephant Whisperer, (हत्तीचा मित्र), ठाणे, सौजन्य : श्री राजेश चौगुले फाऊंडेशन, अंकलखोप, शाहीर श्री. आनंदराव केशव सुर्यवंशी शाहिरीरत्न पुरस्कार शाहीर नंदेश उमप, मुंबई , सौजन्य: वरदविनायक एच.पी. गॅस एजन्सी, अंकलखोप, युथ आयडॉल पुरस्कार लकी गर्ग (LKY Art Line) व्यक्ती-चित्रकार शिमला हिमाचल प्रदेश सौजन्य : साई इंडस्ट्रीज कुपवाड एम.आय.डी.सी., सांगली डी. के. ग्रुप, अंकलखोप
यांना पुरस्कार वितरण झाले. तसेच पुरस्कार देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचाही आमदार डॉ.कदम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री . कदम म्हणाले ,” कृष्णा काठावर साहित्याची अनेक वर्षाची परंपरा आहे . हा भाग जसा सुजलाम सुफलाम आहे तसा साहित्यातून संस्काराची पेरणी करणार आहे. पहिल्याच वर्षी ” शब्दसुर” या मंडळाने दिग्गज मंडळींना एकत्र आणून चांगले विचार ऐकण्याची संधी परिसरातील लोकांना दिली आहे . यापुढेही साहित्याचा जागर सातत्याने चालू राहावा . त्यासाठी आम्ही सर्व ती मदत करू.”
इंद्रजीत भालेराव यांनी ” काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता , माझ्या गावाकडे चल रे दोस्ता” ही कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. अंकलखोप येथे मोठ्या संघर्षानंतर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व यशवंतराव चव्हाण यांच्या एकत्र येण्याची आठवण , औदुंबर येथील साहित्य संमेलनाच्या, (स्व.) कवी ज्ञानेश्वर कोळी यांच्या आठवणी सांगितल्या.
शाहीर नंदेश उमप यांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचे दर्शन ,औदुंबर येथील दत्त मंदिर व संपूर्ण वातावरण पाहून भारावून गेल्याचे सांगितले . यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांची “माझी मैना गावाकडे राहिली” कविता व “गर्जा महाराष्ट्र माझा” हे पोवाडा सादर केला.
उद्योजक राजेश चौगुले व प्रकाशराव पवार यांनी शब्दसुर साहित्य व सांस्कृतिक मंचाला या पुढील काळातही भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले.
पुरस्कार प्राप्त हत्ती मित्र आनंद शिंदे साहित्यिक नवनाथ गोरे व व्यक्तिचित्रकार लकी गर्ग यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शब्दसुरचे अध्यक्ष सुभाष कवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्रीकांत माने व कवयित्री लता ऐवळे कदम यांनी केले. यावेळी शाहीर आनंदराव सूर्यवंशी , उद्योजक डी. के. चौगुले, डॉ. विनायक मगदूम , सोसायटी अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी , उदय पाटील, जयवंत सूर्यवंशी बाळासाहेब मगदूम उपसरपंच अभिजीत पाटील आदी उपस्थित होते. शब्दसूरचे उपाध्यक्ष राजेंद्र खामकर , माजी सरपंच अनिल विभुते, आप्पासाहेब सकळे , वैभव यादव , प्रसाद कोळी , महेश चौगुले शशिकांत हजारे , सतीश यादव , प्रदीप करजगार , संदीप कोळी , विकास गावडे , उत्तम साळुंखे आदींनी संयोजन केले.