सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांची 85 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांची उपस्थिती

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांची 85 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे होते. प्रारंभी वर्षभरातील विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दैनिक त्यानंतर ग्रंथ पूजनाने वार्षिक सभेस सुरुवात झाली प्रारंभीर कार्यवाहक आणि सुप्रसिद्ध साहित्यिक सुभाष कवडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून वाचनालयाच्या वर्षभरातील प्रगतीचा विविध उपक्रमांचा विस्ताराने आढावा घेतला वाचनालय महाराष्ट्रातील एक नामवंत वाचनालय करण्याचा आपणा सर्वांचा प्रयत्न असल्याचे श्रीयुत कवडे यांनी सांगितले यानंतर जयंत केळकर यांनी जमाखर्च पत्रके अंदाजपत्रक अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेला गतवर्षीचा खर्च इत्यादी बाबी सादर केल्या यावर सभेमध्ये साधक-बाधक चर्चा होऊन या सर्व जमाखर्च पत्रकांना व अंदाजपत्रकाला सभेने सर्वानुमते संमती दिली यावेळी अभ्यंकर आणि कंपनी सांगली यांना 25 26 या वर्षासाठी ऑडिटर म्हणून सर्वांमध्ये नेमणूक करण्यात आली यावेळी भूना मगदूम रमेश चोपडे जयदीप पाटील,जगन्नाथ माळी,महादेव जोशी यांच्यासह अन्य सभासदांनी वाचनालयास उपयुक्त सूचना करून वाचनालयाच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला.अध्यक्ष स्थानावरून बोलताना गिरीश चितळे म्हणाले वाचनालयाची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. अजूनही आपणाला बरीच विकास कामे करावयाचे आहेत या वर्षीच्या दिवाळी अंक योजनेत जास्तीत जास्त सभासदांनी सहभाग घ्यावा आणि वाचन संस्कृती विकसित करावी याच सभेत वाचनालयास दिले देणगी देणाऱ्या सभासदांचा ग्रंथ भेट देणाऱ्या सभासदांचा आणि स्वच्छते कामी सहकार्य केलेल्या सभासदांचा विशेष ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. सभेस उपाध्यक्ष डी आर कदम विश्वस्त जी.जी .पाटील रघुनाथ भाऊ देसाई डॉक्टर बी. व्ही.कुलकर्णी सर्व संचालक पत्रकार व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी अशोक साठे गुरुजी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. व चहापानानंतर ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.रघुनाथ भाऊ देसाई यांनी 5000 रुपये जीजी पाटील यांनी एक हजार रुपये तर जयकुमार श्रीपाल तारे साहेब यांनी साडेआठ हजार रुपयांची देणगी वाचनालयास यावेळी प्रदान केली. रमेश चोपडे यांनी 5000 रुपये देणगी देण्याचे जाहीर केले.